संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांचा चौंडी येथील धनगर आरक्षण आंदोलनाला पाठिंबा


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी चौंडी येथे उपोषणस्थळी भेट देऊन धनगर आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

चोंडी येथे धनगर आरक्षणासाठी आज चौदाव्या दिवशी आंदोलन सुरू आहे. मंगळवारी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व जाहीररीत्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला या संदर्भात त्यांनी तसे पत्रही दिले आहे पत्रात म्हटले आहे की 'धनगर आरक्षणाचा लढा साठ वर्षापासून सुरू आहे. 'धनगड की धनगर' या शब्दछलामुळे धनगर समाजाला महाराष्ट्रात एसटी प्रवर्गा मधून आरक्षण मिळत नाही. म्हणून धनगर समाजाचे हजारो कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून संघर्ष करत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं असेल तर समाज हा शिक्षित व आरक्षित असलाच पाहिजे तरच प्रतिनिधित्व मिळेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलनाची ढग प्रचंड आहे. प्रत्येक समाज बांधव पोटतीडकीने लढत असून सरकार मात्र निगरगठ्ठपणे हा सर्व संघर्ष लांबून पाहत आहे.
या विरोधात अजून ताकतीने आपणा सर्वांना मिळून संघर्ष करावा लागेल. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे ते धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं मिळालच पाहिजे.

यशवंत सेनेच्या वतीने राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जन्म गावी चौंडी येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणास संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी आपणास पाठिंबा देत आहोत व पुढील संपूर्ण लढ्यात आम्ही सर्व ताकतिनिशी सहभागी होऊ. यापुढेही आपण जो योग्य तो निर्णय घ्याल संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत.


Post a Comment

Previous Post Next Post