चौंडी येथे उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांचा आज पासून जलत्याग
जामखेड प्रतिनिधी
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चोंडी येथे सुरू असलेल्या आरक्षणाची सरकार कुठलीही दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ उपोषणकर्ते सुरेश बंडकर यांनी बुधवारपासून पाणी त्याग केले आहे. तर नगर येथे उपचार घेत असलेले अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती घालवल्यामुळे त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जाती मध्ये समावेश करावा या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म गावी चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेल्या 14 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर ची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्यामुळे आज बुधवारी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
उपोषण स्थळी उपचार घेत असलेले उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी सरकारच्या निषेधार्थ बुधवारपासून पाण्याचा त्याग केला आहे. ते म्हणाले 'सरकारला आमच्या जीवाची परवा नाही पालकमंत्र्यांनी आजपर्यंत आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही. सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांना पाठवण्यात आले. त्यांनी तातडीची बैठक लावून मार्ग काढू असे आश्वासन दिले होते परंतु तसे काहीही झालेले दिसत नाही. त्यामुळे आम्ही आजवर अन्नत्याग केला होता आता आजपासून पाणीही त्याग करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
Tags
धनगर आरक्षण