जामखेड शहरात कोजागिरी पौर्णिमे निमित्त नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ओपन गरबा दांडिया चे आयोजन


बाईपण भारी देवा फेम अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी - मोने व शिल्पा नवलकर यांची विशेष उपस्थिती


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने  शनिवारी दि.२८/१०/२०२३  रोजी जामखेड येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त माहिलांसाठी ओपन गरबा दांडीया चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी " बाईपण भारी देवा '  फेम सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी - मोने व अभिनेत्री शिल्पा नवलकर उपस्थित राहणार आहेत.


या गरबा दांडिया चे आयोजक अमित चिंतामणी हे विविध सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. त्या अंतर्गतच गेली ८ वर्षांपासून ते कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबवित असतात. त्यानुसारच याही वर्षी ओपण गरबा दांडीया  आयोजन केले असून यामध्ये नक्षत्र मंगळागौर ग्रुप,पुणे  यांचा गरबा दांडिया कार्यक्रम होणार आहे.


हा कार्यक्रम जामखेड शहरातील ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड येथे शनिवार दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत होणाऱ आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अमित
चिंतामणी व सौ.प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post