जामखेड येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
"आंबेडकरी समाजाने बौद्ध धर्मातील २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पणे पालन करणे आज काळाची गरज आहे, समाजातील अनिष्ट,रूढी, परंपरा व कर्मकांड यावर त्यांनी प्रकाश टाकून त्या दूर करण्यासाठी बौध्द अनुयायांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे" प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे व्याख्याते प्रा. प्रशांत चव्हाण
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मियांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे साजरा करतात. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ७ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. आज रोजी जामखेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन ( नालंदा बुध्द ,विहार) बाजारतळ येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन भारतीय बौद्ध महासभा,शाखा जामखेड च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे व्याख्याते प्रा. प्रशांत चव्हाण म्हणाले की, आंबेडकरी समाजाने बौद्ध धर्मातील २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पणे पालन करणे आज काळाची गरज आहे, समाजातील अनिष्ट,रूढी, परंपरा व कर्मकांड यावर त्यांनी प्रकाश टाकून त्या दूर करण्यासाठी बौध्द अनुयायांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्ष केंद्रीय शिक्षिका सुरेखाताई सदाफुले,ॲड. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, बापूसाहेब गायकवाड, बापूसाहेब ओहोळ,संतोष गव्हाळे, हरिभाऊ कदम गुरूजी,प्रभाकर सदाफुले, सिध्दार्थ साळवे,राजन समिंदर, राजन मेघडंबर,ज्ञानदेव साळवे, सतिश सदाफुले, सुनील जावळे,प्रा. राहुल आहिरे, विनोद सोनवणे,दादा मोरे, विनोद घायतडक,दिपक घायतडक, दादा घायतडक,अजिनाथ शिंदे आदी नगरसेविका विद्याताई वाव्हळ,सुरेखा ताई सदाफुले तसेच उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य अशोक आव्हाड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष भेट झालेले नान्नज येथील नारायण साळवे व मोहा येथील उत्तम जावळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौधदाचार्य अशोक आव्हाड, बलभीम जावळे,संजय वारभोग, मुकूंद घायतडक आदींनी परिश्रम घेतले.
Tags
जामखेड