महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
मुंबईहून बीड कडे जाणारी सागर ट्रॅव्हल्स जामखेड जवळ असलेल्या आष्टा फाट्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेल्यामुळे बस उलटली व 150 ते 200 मीटर ही बस रस्त्याने घसरत गेली. बस घसरत असताना बऱ्याच जणांनी बाहेर उड्या टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले. तर सुमारे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयतांची नावे व निश्चित आकडा अद्याप कळू शकलेला नाही.
आज गुरुवार दि 26 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर आमदार सुरेश धस यांचे स्वीय सहाय्यक दत्ता हुले यांचा जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन आल्यानंतर त्यांनी तात्काळ आपली ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी इतर अनेक ऍम्ब्युलन्सलाही फोन लावले. अपघाताची भीषणता सांगत असताना संजय कोठारी म्हणाले की "घटनास्थळी मी सर्वात आधी पोहोचलो होतो. त्यानंतर आमदार सुरेश आण्णा धस हे देखील लगेच पोहोचले. बस उलटून साधारण दीडशे मीटर रस्त्याने घसरत गेली होती. आम्ही मदत कार्य सुरू करत असताना एका लहान मुलाचा हात तुटून रस्त्यावर पडल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर मी तो तुटलेला हात उचलून गाडीत ठेवला. त्याला जामखेडला आणण्यात आले. तेथून परत त्याचा तुटलेला हात व तो मुलगा नगरच्या खाजगी रुग्णालयाकडे रवाना झाला. सकाळी आम्ही घटनास्थळी असताना दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दहा ते बारा जण गंभीर जखमी होते त्यांना आष्टीला व काहींना नगरला हलवण्यात आले होते. असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले.
या बाबत अधिक माहिती अशी की काल रात्री मंबईहुन बीडकडे एन. एल. ०१ बी. २४९९ या क्रमांकाची खाजगी बस प्रवासी घेऊन निघाली होती. या बस मध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. ही बस आज २६ ऑक्टोबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास जामखेडच्या सरहद्दीपासून अगदी जवळच आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळ उलटली.
या आपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. उपचारात जबादरम्यान आणखी चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे कळते. परंतु त्यांची अद्याप नावे समजू शकली नाही. दहा ते बारा जण गंभीर जखमी तर पंचवीस ते तीस जण कीरकोळ जखमी झाले आहेत. मयत व जखमींची नावे अद्याप मिळु शकेलेली नाहीत.
आपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आ. सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर रमेश आजबे, माजी सरपंच सुनिल कोठारी, संदेश कोठारी, आमोल गिरमे, गणेश डोंगरे, चिंचपूर चे सरपंच ढवळे मेजर, हरीणारायण आष्टा येथिल सरपंच पठाडे, जामखेड चे वसीम सय्यद, गणेश बांदल, प्रविण उगले, आ. रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनय डुकरे, गुलाब पटेल युवा मंच चिंचपुर देवाचे, दीपक भोरे, विशाल ढवळे, अशोक टेकाळे तात्या राझे यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. घटनास्थळी तातडीने पंधरा रुग्णवाहिका व दोन जेसीबी पाचारण करण्यात आल्या होत्या. जेसीबी च्या सहाय्याने रस्त्यावर आडवी पडलेली खाजगी बस बाजुला घेण्यात आली व नंतर वाहातुक सुरळीत करण्यात आली.