महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे आज (दि. २६) निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तर कीर्तनकार व प्रवचनकार होते. त्यांचे गायन अतिशय मधुर होते. त्यांच्या अनेक चाली त्यांच्या नावानेच ओळखल्या जातात. गावोगावी मंदिरात रोज त्यांच्याच हरिपाठाच्या कॅसेट ऐकायला मिळतात.
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म साताऱ्यात ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. त्यांच खरं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं होतं. त्यांनी इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण केलं. त्यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. त्यांचे वडिल ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. तर आई लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांनाही संत वाङ्मयाची आवड होती.
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी आज (दि.२६) मुंबईतील नेरुळ येथे अखेरचा श्वास घेतला. ते ८९ व्या वर्षांचे होते. उद्या (दि.२७) संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच पार्थिव आज (दि. २६) दुपारी तीन नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं.
सातारकर घराण्याची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ते वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा पुढे सुरु ठेवली. ते चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांचे शिष्य. त्यांनी हजारो लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. त्याचबरोबर त्यांनी १९८३ साली श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था स्थापित केली.
Tags
बाबा महाराज सातारकर