एवन टेक्स्टाईल वस्रदालन अल्पावधीतच नावारूपाला येईल - सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेडला येऊन बारा वर्षे झाली होती. एवन टेक्स्टाईल च्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज पुन्हा येणे झाले. इथं राजकीय सामाजिक अध्यात्मिक व व्यावसायिक अशा सर्वच क्षेत्रातील लोक एकमेकांना सहकार्य करतात असं दिसलं. जामखेडच्या लोकांना एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका आहे. त्यामुळे बोराटे परिवार व राऊत परिवार यांचे एवन टेक्स्टाईल हे दालन अल्पावधीतच लोकप्रिय होईल. "असे प्रतिपादन सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी जामखेड येथे केले.

    जामखेड शहरातील नव्याने सुरू झालेल्या एवन टेक्स्टाइल या चारमजली भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी खा. सुजय विखे पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, पांडुरंग शास्त्री (देवा) देशमुख, अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प रामकृष्ण महाराज रंधवे (बापू), एच यु गुगळे उद्योग समूहाचे संचालक रमेश गुगळे यांच्या सह विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते. 

    सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाल्या "की तरुण मुले दहावी बारावीनंतर बाहेरगावी जातात परंतु राऊत आणि बोराटे कुटुंबीय कुटुंबातील सर्व तरुण तरुणांनी शहरातून शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या स्वतःच्या गावात हा व्यवसाय सुरू करताना अतिशय सूत्रबद्ध काम केलेले दिसून येत आहे. गाव पातळीवर व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रात एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार होत असतात परंतु जामखेडला मात्र तसे नाही येथे एकाच व्यासपीठावर सर्वच क्षेत्रातील लोक एकत्र आले आहेत ही अतिशय चांगली बाब आहे. इतक्या सर्वांची जर साथ असेल तर राऊत आणि बोराटे कुटुंबीयांनी सुरू केलेले एवन टेक्स्टाईल हे दुकान अल्पावधीतच नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. मी बारा वर्षांपूर्वी जामखेडला चिंतामणी ज्वेलर्स या दुकानाचे उद्घाटन करायला आले होते. असे त्यांनी आवर्जून यावेळी सांगितले"

    यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी या नवीन दालनाला शुभेच्छा दिल्या ते म्हणाले" कै विठ्ठलराव राऊत अण्णा यांचे राजकीय सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये योगदान होते त्यांच्यावर प्रेम करणारे या परिसरात असंख्य लोक आहेत." 

    अखिल भारतीय वारक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले आपल्या भाषणात म्हणाले "विठ्ठलराव राऊत अण्णा यांचे माझे खूप जवळचे संबंध होते त्याचप्रमाणे बोराटे कुटुंबीयांचे सुद्धा आमचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे मी आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो अण्णांनी जातीपलीकडे जाऊन समाजकार्य केले. धर्म कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी विजयाताई यांची मोलाची साथ होती. त्यांचे पुत्र विनायक व महेश हे देखील अण्णांच्याच विचारावर पुढे जात आहेत त्यामुळे त्यांचे भवितव्य नक्कीच उत्तम आहे."

    ह भ प रंधवे बापू यांनी यावेळी व्यवसायातील काही सूत्र सांगत असताना ते म्हणाले "ज्याला खरेदी कळते त्यालाच उत्तम विक्री करता येते. व्यापार करत असताना खरेदी नेहमी घासून करावी तरच विक्रीचा दर योग्य ठरवता येतो. रंधवे बापूंनी सुद्धा विठ्ठल आण्णा यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला व या नवीन दालनाला त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 

    एच यु गुगळे उद्योग समूहाचे संचालक रमेश गुगळे यांनी यावेळी व्यवसायातील सूत्र सांगितले ते म्हणाले "आम्ही कापड व्यवसायामध्ये गेल्या 55 वर्षापासून काम करत आहोत. परंतु प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकण्यासारखा असतो. व्यवसाय करत असताना आपल्याला दररोज अपडेट राहावे लागते. आम्ही आजही हा व्यवसाय शिकत आहोत." असे सांगत असताना ते म्हणाले "पूर्वीच्या काळात माणसाला प्रत्येकाला साधारण एक दोन ड्रेस असायचे. आता तसे राहिले नाही आता पुरुष आणि त्याहून अधिक स्त्रिया वस्त्र खरेदी करतात. आणि घरी कपाट भरलेले असतात. त्यामुळे कापड व्यवसायासाठी चांगले दिवस आहेत. एवन टेक्स्टाईल या नवीन दालनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी शुभेच्छा. 

    प्रास्ताविक करत असताना एवन टेक्स्टाईल चे संचालक विनायक राऊत म्हणाले "आमचे वडील विठ्ठल अण्णा राऊत यांनी या दुकानाचे स्वप्न पाहिले होते. परंतु कोरोना काळ आला आणि त्या करोनाने अण्णांना आमच्यातून हिरावून नेले. आजही आम्हाला ती आठवण झाली की आश्रुवानावर होतात. अण्णा गेल्यानंतर आमचं आभाळच फाटलं. परंतु साधू (नाना) बोराटे हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्यामुळेच अण्णांचं हे स्वप्न आज पुर्ण होऊ शकला यावेळी विनायक राऊत अतिशय भावुक झाले.

    यावेळी प्रा. मधुकर राळेभात,आमदार प्रा. राम शिंदे यांचे     स्वीय सहाय्यक डॉ. अल्ताफ शेख, डॉ. भगवान मुरुमकर, सुर्यकांत मोरे, डॉ. भास्कर मोरे, नगरसेवक अमित चिंतामणी, मंगेश आजबे, रवी सुरवसे, मनोज कुलकर्णी, गौतम उतेकर, संजय वराट, प्रा. अरुण वराट, आण्णासाहेब सावंत, नारायण राऊत,सोमनाथ पाचारणे, सुरेश भोसले, प्रा. ज्ञानदेव कुंभार, लहू शिंदे, महेश राऊत, अनंता खेत्रे, शंकर राऊत, भानुदास बोराटे, साधु (नाना) बोराटे, डॉ. रोहन बोराटे, कविता जगदाळे, सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली बोराटे सह राऊत व बोराटे कुटुंबांवर प्रेम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विनायक राऊत यांच्या भगिनी श्रुती राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.




Post a Comment

Previous Post Next Post