प्रस्तुती पूर्व वेदनेने त्रासलेल्या उसतोड कामगार महिलेस संजय कोठारी व डॉ युवराज खराडेंची मदत

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारीं सारखी माणस आहेत म्हणुनच जगात माणुसकी आहे - उसतोड कामगार
   महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : - प्रसृती पुर्व वेदनेने हतबल झालेल्या उसतोड मजुर महिलेस वेळीच मदत व सहकार्य करून हॉस्पीटल ला दाखल करत मोलाचे सहकार्य केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व मोफत उपचार करणारे डॉ युवराज खराडे यांचे सर्व स्थरातुन कौतुक होत असुन खरोखरच डॉक्टर मध्ये देव असतो याची जाणीव जामखेड पंचक्रोशीतील जनतेला डॉ खराडे व संजय कोठारी यांच्या माध्यमातुन झाल्याचे बोलले जातेय. 

  पोटाची खळगी भरण्यासाठी उन वारा थंडी अथवा इतर कसल्याच आसमानी संकटाची पर्वा न करता दारिद्रयाला तोंड देऊन दोन वेळच जेवण भागवण्यासाठी गावोगावातुन उसतोड मजुर सहकुटुब रस्त्याने उद्यड्या ट्रॅक्टर ट्रक टेम्पो अथवा बैलगाडीतुन दर कोस दर मुक्काम करत कारखान्याच्या दिशेने वेळी अवेळी जाताना दिसतात. आपल्या सर्व कुंटुबासह हा खडतर प्रवास त्यांना करावा लागत असतो यावेळी फक्त देवच वाली आणी पाठीराखा म्हणुन हिमतीने रस्ता पार करण एवढाच त्यांचा धर्म. असाच प्रवास करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील वरझडी या गावची उसतोड कामगार गरोदर महिला कुटुंबा सोबत उसतोडीसाठी जात असताना जामखेड परिसरातील नान्नज गावाच्या शिवारात प्रसृती पुर्व वेदने व्याकुळ झाली होती. 

   जवळ मोजकेच पैसे ते पण अपुरे मदत आणी विलाजाची निशनान्त गरज असताना सुनील ऊर्फ अतुल हजारे यांच्या सांगण्यावरून जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी स्वताची अँबुलन्स घेऊन महिलेच्या मदतीस धावुन गेले प्रथम नान्नज प्राथमिक अरोग्य केंद्रात तर नंतर जामखेड येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात वेदना पिडीत महिलेस दाखल करून उपचार करण्याचे प्रयत्न केले पण दोन्ही सरकारी दवाखान्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण दोन्ही दवाखान्यात कसलीच सुवीधा उपलब्ध नसल्याचे कळाल्यावर कोठारी यांनी समाज कार्यात मदत व सहकार्य करणाऱ्या खाजगी हॉस्पीटलच्या डॉ युवराज खराडे यांच्या कडे धाव घेत त्यांना विनंती करत सदर महिलेची मोफत प्रसृती करण्यास सांगीतले त्यावरून डॉ युवराज खराडे यांनी कसलाच विचार न करता आपले डॉक्टरी कर्तव्य बजावण्यास सुरवात करत महिलेवर मोफत उपचार सुरु केले. आणी उचारा दरम्यान वेदना पिडीत महिलेन एका गोंडस मुलीला जन्म दिला असल्याने संपुर्ण परिसरात डॉक्टर खराडे यांच्या या दातृत्व भावनेची चर्चा होत असुन खरोखरच डॉक्टरात देव असतोच याची प्रचीति व चर्चा जनमानसातुन होत असुन संजय कोठारी डॉ युवराज खराडे यांचे कौतुक केले जात आहे. 

   तर वेदना पिडीत महिलेच्या पती अंकुश गायकवाड यांनी डोळ्यात आश्रु आणत खरोखरच संजय कोठारी आणी डॉक्टर हेच आमचे खरे देव आहेत हे स्पष्ट केले तर इतर ऊस तोड कामगारांनी हात जोडत आभार व्यक्त केले. 

Post a Comment

Previous Post Next Post