जामखेड प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमवारी जामखेड शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माहिलांनी कँण्डल मार्च काढला.
आरक्षण मिळाल्या शिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असे कँण्डल मार्च दरम्यान मराठा समाजातील माहिला व मुलींनी भाषणातून सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून जरांगे पाटिल हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण लागु करण्यासाठी जामखेड शहरातुन मराठा क्रांती मोर्चा महीला विभाग यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.
या कॅन्डल मार्च मध्ये हजारो महीलांनी हातात मेनबत्ती पेटवून शहरातुन कॅन्डल मार्च काढत मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.
छत्रपती संभाजी महाराज मार्ग,बिड रोड काॅर्नर, जयहिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ,शनी चौक, संविधान चौक, खर्डा रोड, खर्डा चौक ते तहसील कार्यालय समोर रॅली दरम्यान " जय जिजाऊ, जय शिवराय ,एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे असे घोषणाने जामखेड शहर दुमदुमून गेले.
मराठा समाजातील पुरुष, महिला तसेच लहान मुले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कँण्डल मार्च चा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.