पाथर्डी प्रतिनिधी. श्री संत भूमी कला क्रीडा प्रतिष्ठान व स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या पहाटे आयोजित संगीत मैफिलीने पाथर्डी करांची मने जिंकली. गायक प्रा. जनार्दन बोडखे व शाहीर भारत गाडेकर यांनी भावगीत , भक्ती गीत, अभंग , गवळण गीत गायन सादर करीत दिवाळी पहाट पाडव्यांची रंगत वाढवली. अनेक वर्षापासून प्रा . बोडखे व त्यांचे सहकारी हा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ भजन गायक बाबासाहेब जायभाय. विष्णुपंत चिंतामणी. बाळासाहेब शहाणे. ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री. ह भ प संजय महाराज वारे. सोमनाथ घोरपडे. आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला ओमकार स्वरूपा....
या भावगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कट्यार काळजात घुसली. या चित्रपटातील सूर निरागस हो... विठू माऊली तू माऊली जगाची... आली माझ्या घरी ही दिवाळी... अबीर गुलाल उधळीत रंग... अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी शहरवासीय तल्लीन होऊन गेले होते. शाहीर गाडेकर यांनी पहाडी आवाजात गायलेले या पंढरपुरात काय वाजत गाजत... या गाण्यांनी प्रेक्षकात जल्लोष निर्माण झाला. या गीतांना साथ संगत हार्मोनियमवर चेतन सोनवणे. तबल्यावर संगीत विशारद राजेंद्र चव्हाण. अजय वडागळे. यांनी साथ दिली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर बोडखे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शैलेश शिंदे यांनी केले तर शेवटी आभार ऋषिकेश शिरसाठ यांनी मांडले. यावेळी अनुष्का दहिफळे , अनुराधा डांगे, रिया कटारनवरे. संजना कटारनवरे, युवराज धायतडक. तन्मय पवार. अश्विनी कुलथे. स्वरा वावळ. राजनंदिनी पारखे. रुद्रास वराडे. आदी विद्यार्थ्यांनी गायनाद्वारे सुरांची मुक्त उधळण केली. हेचि दान देगा देवा.... तुझा विसर न व्हावा... या भैरवीच्या श्रृंखलेने मैफिलीची सांगता झाली.