जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी दिलीप गुगळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड


 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : 
     नुकत्याच पार पडलेल्या श्री वर्धमान जैन श्रावक संघ जामखेडच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला बहुमत मिळाले होते.  त्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारीणीनुसार प्रसिद्ध उद्योजक  दिलीप गुगळे यांची अध्यक्षपदी, महावीर बाफना उपाध्यक्ष तर शरद शिंगवी यांची सेक्रेटरीपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

   तब्बल २५ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत कोठारी यांच्या पॅनलची सत्ता जाऊन जैन श्रावक संघावर बाफना व गुगळे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ या संस्थेच्या १३ जागांसाठी परिवर्तन पॅनल आठ जागा, अरिहंत पॅनल तीन जागा व दोन जागांवर अपक्षांना विजय मिळाला. जैन समाजाच्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच निवडणूक घेण्यात आली.

  दि. १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या पदाधिकारी निवडीनुसार अध्यक्षपदी दिलीप गुगळे, उपाध्यक्षपदी महावीर बाफना तर सेक्रेटरीपदी शरद शिंगवी यांची निवड झाली आहे.

वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ सर्व पदाधिकारी व सभासद
परिवर्तन पॅनलचे 
अध्यक्ष दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना, सेक्रेटरी शरद शिंगवी, संचालक आकाश बाफना, मंगेश बेदमुथ्था, निखिल बोथरा, संतोष फिरोदिया, कुंदनमल भंडारी, 

अरिहंत पँनलचे 
 कांतीलाल कोठारी, विनोद बेदमुथ्था,  जितेंद्र बोरा 

दोन अपक्ष विजयी
संजय गांधी व लक्ष्मी रवींद्र गादिया

Post a Comment

Previous Post Next Post