जामखेड येथील युवा उद्योजक संदेश सुनिल कोठारी (वय ३९) यांचे दि २५ रोजी संभाजीनगर येथे खाजगी हाँस्पीटल मध्ये निधन झाले त्याचेवर दि २६ रोजी जामखेड येथे त्यांचे शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते माजी सरपंच सुनिल कोठारी यांचा मुलगा होत त्यांचे मागे आई वडील भाऊ पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये संदेश कोठारी यांच्यावर रविवारी अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे, राजेंद्र पिपाडा, देविदास धस, दिलीप बाफना, अमित चिंतामणी, शांतीलाल गांधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अजय काशिद, शशिकांत देशमुख, प्रा. मधुकर राळेभात, मंगेश आजबे, सुरेश भोसले, सुर्यकांत मोरे, , प्रशांत बोरा, महावीर कटारिया, सुभाष कटारिया रतिलाल कटारिया, स्वरूप कटारिया, रतन संकलेचा, पारस भंसाली, सुरेश राठौड़ , अभिजीत डूंगरवाल, दीपक खेड़कर, राजेंद्र गोरे, रवींद्र शेळके, तर भरत दारकुंडे, डॉक्टर वारे, किसन चिंतामणी, सचिन फिरोदिया, मंगेश बेदमुथा, कैलास शर्मा,चंपालाल राठौर,रमणलाल बडजाते, लक्ष्मण ढेपे, शहाजी राळेभात, हर्षल डोके, संजय बलाई, प्रफुल्ल सोळंकी, सचिन कर्नावट, ताराचंद कटारिया, विनोद चंडालिया, अशोक अबड, राजकुमार अचलिया,प्रशांत बोकरिया, अनिल पिपाडा, नरेंद्र पिपाडा, अभय पिपाडा, सुभाष पिपाडा,सुभाष भंडारी सुभाष भळगट, गणेश लुंकड़, चंपालाल लोढ़ा, पारस पारख, मनोज दुगड राहुल राखेचा गणेश भळगट, एडवोकेट सुंतीलाल बलदोटा, राजेंद्र बलदोटा, प्रतिकेश बोकरीया ,चेतन सुराणा, दीपक खेडकर, विनोद बेदमुथा ,प्रवीण छाजेड, महावीर सूराना ,यासह मोठ्या संख्येने मित्रपरिवार व नातलग उपस्थित होते.
संदेश कोठारी हा जामखेडचे माजी सरपंच व प्रसिद्ध व्यापारी सुनील कोठारी यांचा मुलगा तर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पारस कोठारी यांचा पुतण्या होता. त्यांच्या अकाली जाण्याने कोठारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
चाळीसगाव जवळील हिंगोणे गावाजवळ झालेल्या भयानक अपघातात अरुण मोरे (४५, रा. घोगरगाव, श्रीगोंदे) हा जाग्यावरच मृत पावला होता. आणि यातील जखमी संदेश कोठारीचे काल निधन झाले होते. तर रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा. (जामखेड) हे जखमी होते. यातील बोथरा हे नगर येथे उपचार घेत आहेत.
Tags
निधन वार्ता