शालेय तायक्वांदो स्पर्धा सहा डिसेंबरपासून, किकबॉक्सिंग चारपासून


 जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांची माहिती


       नगर : शालेय तायक्वांदो व किक बॉक्सिंग स्पर्धा जाहीर करण्यात आले असून दोन्ही संघटनांनी या स्पर्धा शांततेत पार पाडाव्यात व कुठलेही वाद होऊ देऊ नयेत अशा सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी दिले आहेत. तायक्वांदोच्या जिल्हा स्पर्धा 6 ते 8 दरम्यान व 11 व 12 डिसेंबरला मनपा स्पर्धा होतील. किकबॉक्सिंग च्या 4 व 5 डिसेंबरला मनपा, तर 14 व 15 डिसेंबरला जिल्हा किकबॉक्सिंग स्पर्धा होणार आहेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी सांगितले. 

        यंदाच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमात तायक्वांदो, किकबॉक्सिंग आणि कराटे या तीन खेळांच्या स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर झाला नव्हता. या खेळांच्या संघटनांच्या वादातून क्रीडा व युवक सेवा संचालनालय कार्यलयाने बोलवलेल्या बैठकीतून तायक्वांदो व किकबॉक्सिंग संघटनेच्या दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी क्रीडा आयुक्तांना दोन्ही संघटना मिळून स्पर्धा घेण्याचे आवश्वास दिले. यानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने या स्पर्धांचा निर्णय जाहीर केला. यामुळे स्कूल गेम फेडरेशनने राष्ट्रीय स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामुळे राज्यातील क्रीडा स्पर्धा पुढील महिन्यात घेण्यासाठी क्रीडा आयुक्तांनी पत्र जारी केले आहे. यामुळे प्र-जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी बुधवारी (दि. 29) दोन्ही खेळांच्या दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलवली होती. या बैठकीतून डिसेंबर महिन्या शालेय क्रीडा स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले. 

      या बैठकीमध्ये विविध विषयांसह स्पर्धा आयोजनावर चर्चा करण्या आली. यामध्ये सुरवातीला क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी स्पर्धा आयोजनाबाबद काही नियम सांगितले. ते म्हणाले, तायक्वांदो आणि किकबॉक्सिंगच्या स्पर्धा यंदा होणार असून, कराटेच्या संघटनांचे एकमत न झाल्याने या स्पर्धा यंदा होणार नाहीत. या स्पर्धेतून दोन्ही संघटनांनी एकत्रित येत ही स्पर्धा घ्यावयाची आहे. स्पर्धेमध्ये कुठेही वाद किंवा काही घडल्यास पुढील स्पर्धा होणार नाहीत. याची संघटनांनी खबरदरी घ्यावी. यामुळे खेळाडूंचे नुकसान टाळणे शक्य होईल, असे खुरांगे म्हणाले. 
यावेळी क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, तायक्वांदोचे संतोष बारगजे, अलताफ कडकाले, घनशाम सानप, शकील शेख, सुरेश वाघ, , दिनेश गवळी, धर्मनाथ घोरपडे, तर किकबॉक्सिंगचे नितीन शेलार, महेंद्र कुसळकर, सचिन मकासरे, संतोष खैरनार आदी उपस्थित होते. 

    दोन्ही संघटनांनी मिळून यंदाच्या स्पर्धा आयोजन करावे. तायक्वांदो आणि किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये कुठलाही वाद न होता स्पर्धा पार पाडावी. ही दोन्ही संघटनेची जबाबदारी राहिल. दहावी किंवा बारावीतील खेळाडूंना या स्पर्धांमधून ग्रेस गुण मिळतात. त्यांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी संचालनालयाने चांगला निर्णय घेऊन दोन्ही संघटनांना एकत्रित स्पर्धा घेण्याचे सांगितले आहे. नगरची स्पर्धा ही निकोप होतील.
-दिलीप दिघे, 
 जिल्हा क्रीडा अधिकारी, अ.नगर 

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
खेळाडूंसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख असून ज्या खेळाडूंचे ऑनलाइन अर्ज करण्याचे बाकी असतील त्या शाळेतील क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंचे गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन अर्ज भरावेत म्हणजे कोणत्याही खेळाडूंचे नुकसान होणार नाही. असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post