जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांची कोठारी कुटुंबीयास सात्वन पर भेट
जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी यांचे चिरंजीव आणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे पुतणे तथा जामखेडकरांच्या जिव्हाळ्याचे मित्र स्व संदेश कोठारी यांच्या अपघाती निधनाने सर्व जामखेड व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात असुन सर्व स्तरांतून कोठारी कुंटुबीयांना दुःखातून सावरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राजकीय सामाजिक शैक्षणीक अध्यात्मीक तसेच व्यापारी दुकानदार आणी आप्त इष्ट मित्र परिवार नित्याने भेटी गाठी घेऊन सांत्वन व आधार देण्याचे काम करत आहेत त्यातच स्व संदेशच्या जाण्याने कोठारी कुटुबाची कधी न भरून येणारी हानी झाली आहे. त्यामुळे या भयंकर दुखांतुन बाहेर येण्याचे बळ कोठारी कुंटुबीयाना मिळावे यासाठी सर्व जण सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच कर्जत जामखेड विधान सभा मतदार संघाचे लोकप्रीय आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री व बारामती अँग्रोच्या सर्वेसर्वा सौ सुनंदाताई पवार यांनी कोठारी कुंटुबियाची भेट घेत त्यांचे सात्वन केले. कोठारी घराण्याचे धार्मीक सामाजिक तसेच राजकीय योगदान फार मोठे असुन समाजसेवेत तर त्यांनी वाहुन घेतले असताना देखील त्यांच्या वर अशी वेळ येते हे खुप मनाला लावुन जाणारे असुन सुनील कोठारी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आत्तापर्यंत अपघातातील हजारो लोकांचे प्राण वाचण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतु आपल्या कुंटुबातील एका लेकरास ते कसे वाचू शकले नाहीत असाच प्रश्न मनाला सतावतो आहे. त्यांच्या प्रयत्नाला भगवंताने न्याय देणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही हिच मोठी वाईट गोष्ट आहे. अशी खंत व्यक्त करत सौ सुनंदाताई पवार म्हणाल्या मी जामखेड मध्ये बऱ्याच ठिकाणी फिरले बऱ्याच ठिकाणी सांत्वन भेट दिल्या परंतु तिथे सुद्धा संदेश ची चर्चा होती कमी वयात खूप काही संदेश या मुलाने केले आहे याबद्दल मला सुद्धा दुःख वाटते आपण या दुखातून सावरा तुमच्या दुःखात आम्ही पवार कुटुंबिय सामील असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सुनील कोठारी ,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ,कोठारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी ,संकेत कोठारी, श्रीमती शांताबाई कोठारी, सौ सुवर्णा कोठारी ,सौ सुशीला बलदोटा आदी उपस्थित होते.