आमदार निलेश लंके यांचेकडून सुनील कोठारी यांना सांत्वनपर भेट .

जामखेड । प्रतिनिधी -
जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी यांचे चिरंजीव संदेश कोठारी यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. याबाबतची माहिती समजताच आ. निलेश लंके यांनी जामखेड येथे सुनील कोठारी यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली. 
यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले कोठारी परिवारांचा सामाजिक कार्यात असलेले योगदान पाहून आणि हजारोंचे प्राण वाचवणारे कोठारी परिवार यांच्यावर ही वेळ येणे फार दुःखद आहे परंतु भगवंता पुढे काही विलाज नाही

यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले मी जामखेड मध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो बऱ्याच ठिकाणी सांत्वन भेट दिल्या. परंतु तिथे सुद्धा संदेशची चर्चा होती. कमी वयात खूप काही संदेशने केले आहे. याबद्दल मला दुःख वाटते. आपण या दुखातून सावरा तुमच्या दुःखात आम्ही लंके कुटुंबिय सामील असल्याचे ते म्हणाले

आत्तापर्यंत अपघातातील हजारो लोकांचे प्राण वाचण्याचे प्रयत्न केले आहे. परंतु माझ्या पुतण्यास मी वाचवु शकलो नाही. अशी खंत व्यक्त सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली.

 यावेळी सुनील कोठारी ,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ,कोठारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी , महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र कोठारी, गणेश लुंकड, सुभाष भंडारी, दिलीप भंडारी, अशोक चोरडिया,संकेत कोठारी, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे , पवनराजे राळेभात, शहाजी राळेभात,संभाजी राळेभात,श्रीमती शांताबाई कोठारी, सुवर्णा कोठारी , सुशीला बलदोटा उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post