गणित विज्ञान प्रदर्शन नागेश विद्यालयात उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये शालेय पातळीवर इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थी व गणित विज्ञान शिकवणारे शिक्षकांनी तयार केलेल्या मॉडेलचे प्रदर्शन भरवण्यात आले. 

      यावेळी पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांचे प्रदर्शन चे उद्घाटन महाराष्ट्र रा.कॉ. प्रदेश चिटणीस स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्रजी कोठारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
   व गणित विज्ञान शिक्षकांनी तयार केलेले मॉडेल चे उद्घाटन भूमीअभिलेख उपअधिक्षक संदीप गोसावी साहेब यांच्या शुभहस्ते झाले. 

   यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बीके पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , राजेंद्र गोरे ,भूमीअभिलेख मुख्यालय सहायक संजय डोळस, परिरक्षण भूमापक देवेंद्र टोपे ,पवार प्रा राहुल आहेरे , गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, गोपाल बाबर रघुनाथ मोहोळकर ,साळुंखे बी एस, गाडे पी एस, प्रा कैलास वायकर, रणजीत मोरे ,विधाते मॅडम, रणदिवे एस आर, सांगळे ए एम, फसले सर, श्रीम शिनगारे मॅडम , श्रीम ढाकणे एस एम , गर्जे एस व्ही चौधरे ए एम, अभंग मॅडम सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
       या प्रदर्शनामध्ये समाज उपयोगी गणित विज्ञान विषयासंदर्भातील 95 मॉडेल सहभागी झाले. व शिक्षकांचे 23 मॉडेल सहभागी झाले.
        विद्यालयातील गणित विज्ञान शिक्षक व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आपले वेगवेगळे मॉडेल यामध्ये प्रदर्शित केली. 
         राजेंद्र कोठारी यांनी मनोगत मध्ये नागेश विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी गुणवंत असून विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी सुद्धा गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला हे कौतुकाची बाब आहे व विद्यार्थ्यांना यातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट समाज उपयोगी वेगवेगळे मॉडेल तयार केले ते नक्कीच तालुका जिल्हा विभाग स्तरावर निवडले जातील . प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय नाविन्यपूर्ण उपक्रमात व गुणवत्तेत मध्ये पुढे चाललेले आहे. असे मनोगत व्यक्त केले. 
     भूमीअभिलेख उपअधिक्षक संदीप गोसावी यांनी मनोभातामध्ये मी ही रयत चा विद्यार्थी आहे व शिक्षकांनी विज्ञान गणित प्रदर्शन मध्ये उत्कृष्ट मॉडेल सादर करून सहभाग घेतला हे आनंदाचे बाब आहे यातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता नक्कीच वाढून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे असे मनोगत व्यक्त केले. व विद्यार्थी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. 
   प्रदर्शनाचे नियोजन विद्यालयातील गणित विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.

Post a Comment

Previous Post Next Post