जामखेड प्रतिनिधी..
जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी अतिश भागवत पवार वय ३१ यास रात्री ९:३० वाजता बीड रोड वरील हॉटेल शिवराज समोर, क्रुझर क्र.MH24AW2558, धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. अतिश पवार यांचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. एक तरुण व्यापारी दुर्दैवी घटनेत गेल्याने जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या मागे आई-वडील पत्नी असा परिवार आहे.
घटनेची माहिती समजतात आकाश घागरे आणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी धावपळ केली व रुग्णालयात दाखल केले. परंतु दुर्दैवाने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जामखेड शहरातील व जामखेड ते सौताडा रोडचे काम चालू आहे. काही अंतर एका साईडचा रोड पूर्ण झाला आहे. मात्र एक साईडचे काम धीम्या गतीने चालू आहे. तसेच संबधित कामाचे कसलेही बोर्ड अथवा वेगाचे अडथळे निर्माण केलेले नसल्या कारनाने, चालकांना रात्री रस्त्याचा अंदाज येत नाही, प्रवास करणाऱ्या चार चाकी दोन चाकी वाहनांना खूप अडचण येते. यामुळे बरेच अपघात होऊन बऱ्याच जणांचे प्राण गेले आहेत.
आतिश पवार हे कामानिमित्त बीड रोडला मोटरसायकलवरून जात असताना समोरील क्रुझर ने जोरात धडक दिल्याने तो उडून करुझर च्या बोनेटवर पडून पायाचे हाड मोडले. डोक्याला मार लागला होता. अशा परिस्थितीत त्याला तत्काळ रुग्णालयात आणले परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
यावेळी सुनील जगताप, राहुल घोरपडे, डॉक्टर प्रदीप कुडके, सनी सदाफुले, सचिन खामकर, मारुती काळजाते आदींनी मदत केली.
सदरच्या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली पाटील यांनी ताबडतोब आपले हवालदार पाठवून पंचनामा करून दिला
चौकट
जामखेड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.शशांक शिंदे यांना घटनेची माहिती संजय कोठारी यांनी सांगितली डॉक्टरांनी रात्री दोन वाजता कडाक्याची थंडी असताना पोस्टमार्टम करून केले.