जामखेड :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव व्यवस्थापण समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सौ. काजल पोपट मोरे यांची अध्यक्ष पदी, सतीश भिकाजी यादव उपाध्यक्ष पदी, तर अमोल भास्कर उघडे यांची शिक्षणतज्ज्ञ पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी पोपट जमदाडे, शामराव मोरे, नवनाथ भागवत, राजेंद्र धनवे, निलेश वारे, वैशाली गायकवाड, सुरज धनवे, रेखा पोठरे, कोमल सातव हे व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच नितीन वारे माजी सरपंच सुभाष धनवे, ग्रामपंचायत सदस्य, अमोल राजे यादव, आण्णा यादव, शिवाजी सातव, पोपट मोरे, बाळासाहेब पवळ, बबन मोरे, पत्रकार सुजित धनवे, भीमराव मोरे, हनुमंत मोरे, सुनील पोठरे, अभिजित धनवे, मुख्याध्यापक रामदास गंभीरे सर, भानुदास फुलमाळी सर, शिवाजी घोडके सर, खेडकर मॅडम, आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
शैक्षणिक