शालेय तायक्वांदो स्पर्धा उद्यापासून सुरू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अहमदनगर जिल्हा शालेय तायक्वांदो स्पर्धा सहा डिसेंबरपासून सुरू होणार आहेत 6 डिसेंबरला 14 वर्ष मुले व मुली, 7 डिसेंबर 17 वर्ष मुले व मुली, तर 8 डिसेंबरला 19 वर्षे मुले व मुली याप्रमाणे स्पर्धा होतील. तरी खेळाडूंनी सकाळी नऊ वाजता उपस्थिती नोंदवावी तसेच खेळाडूंना तायक्वांदो युनिफॉर्म व सर्व प्रकारचे गार्ड बंधनकारक राहतील असे जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे व क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क येथे
अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या दोन्ही तायक्वांदो संघटनेचे अधिकृत पंच या स्पर्धेसाठी काम करणार आहेत.
स्पर्धेमध्ये कोणीही वाद विवाद करू नयेत व सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता सर्वांनी हजर राहावे. तसेच खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होताना तायक्वांदो खेळाचा युनिफॉर्म तसेच तायक्वांदो खेळाचे हेडगार्ड, चेस्ट गार्ड, ग्रोइन गार्ड, आर्म गार्ड, सिन गार्ड वापरणे बंधनकारक राहील. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी हाताच्या व पायाच्या बोटांची नखे कापलेली असावेत. हातामध्ये कडे गळ्यात चैन, मुलींनी कानात नाकात किंवा अन्य कोणतेही अलंकार घातलेले नसावेत. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला व आपल्यालाही दुखापत होणार नाही. अशा सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.