जामखेड येथील श्री दुर्गा माता ट्रस्ट लकीड्रॉ सोडत 'होम मिनिस्टर' स्पर्धेत सुवर्णा जाधव प्रथम


जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील बाजार तळ येथील श्री दुर्गा माता जिर्णोद्धारासाठी मंदिर ट्रस्ट च्या नवरात्र उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य लकी ड्रॉ ची सोडत हजारोंच्या उपस्थितीत पार पडली.शिवसेनेचे जामखेड तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर यांच्या वतीने प्रसिद्ध निवेदक अवधूत कुलकर्णी यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

    होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत माहिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.खेळ पैठणीचा होम मिनिस्टर स्पर्धेत  सुवर्णा जाधव यांनी प्रथम क्रमांक , शितल जगताप द्वितीय, तर मनिषा माळी तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

   कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले,माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, प्रसिद्ध उद्योगपती संतोष फिरोदिया,नगरसेवक अमित चिंतामणी, बिभिषण धनवडे, विनायक राऊत, प्रविण बोलभट,भरत जगदाळे, शिवकुमार डोंगरे,आण्णा ढवळे,प्रा.जाकिर शेख, विष्णू गंभीरे, अनिकेत जाधव,गौरव सदाफुले, पांडुरंग समुद्र आदी मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी भव्य लकी ड्रॉ सोडत भाग्यवान विजेत्यांची नावे उपस्थित मान्यवरांच्या तसेच लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये प्रथम बक्षीस ॲक्टिव्हा स्कूटी चे भाग्यवान विजेते अजित कृषी सेवा केंद्र (बीड रोड, जामखेड) ,द्वितीय बक्षीस इलेक्ट्रॉनिक स्कूटर विकास - घाडगे पाटील (बीड रोड, जामखेड),तृतीय बक्षीस,फ्रिज रविंद्र  राळेभात (तपनेश्वर रोड, जामखेड) तसेच ५१ नग, इस्त्री,११ नग, मिक्सर११ नग ,इंडक्शन शेगडी ११ नग भाग्यवान विजेत्यांना देण्यात आले.

  या कार्यक्रमासाठी एस् एस् मोबाईल,एवन टेक्सटाईल्स, आष्टेकर मोबाईल ,एस् मार्ट तसेच बालाजी मंडप (अमोल मोरे) , शंभूराजे साऊंड सिस्टीम ( दिपक पवार) यांनी विशेष सहकार्य केले. श्री दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख देविदास भादलकर यांनी आभार मानले.

  या कार्यक्रमासाठी  दत्ता पवार, रविंद्र वडे, महेश कटारिया,राजु पवार, बालाजी मोरे, सचिन पवार, विकास पवार, राहुल मोरे, सुमित जसाभाटी,संपत बोरा,केतन वडतिले, पिंटू बोथरा,दिपक पवार, रमेश पवार, महादेव मोबाईल शाॅपी,आप्पा परदेशी,टिल्लु बिडकर, मयुर पवार, प्रमोद पवार, बबलू जाधव , मंगेश मोरे,आदींनी घेतले. विशेष परिश्रम घेतले. 

Post a Comment

Previous Post Next Post