सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली जखमींना मदत

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील खर्डा रोड एवन कॉर्नर जवळ डुक्कर आडवे आल्याने मोटरसायकल वरील दोन जण जखमी झाले. 

दिगंबर शंकर ढवळे वय 70 राहणार रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर रामदास वामन पांढरे वय 75 गाव भातोडी तालुका आष्टी जिल्हा बीड हे दोघे जखमी झाले. 

घटनेची माहिती म.रा.वी मंडळ मधील भरत नाईकनवरे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली व लगेच ताबडतोब आपली रुग्णवाहिका घेऊन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना दवाखान्यात दाखल केले. त्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळाले. याकामी सुनिल मोरे यांनी त्यांना मदत केली.

Post a Comment

Previous Post Next Post