दुर्गादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे संतोष फिरोदिया यांच्या हस्ते भुमीपुजन

  महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
जामखेड शहरातील बाजारतळावरील प्रसिद्ध असलेल्या दुर्गादेवी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम दुर्गादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने हाती घेण्यात आले असून जामखेड येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष फिरोदिया यांच्या हस्ते कूदळ टाकून तसेच उद्योजक विशाल शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कामाला सुरुवात करण्यात आली.

                           नियोजित दुर्गादेवी मंदिर 

    दि. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे प्रभु रामचंद्र प्राणप्रतिष्ठा मूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून  उद्योजक संतोष फिरोदिया सह उद्योजक विशाल शिंदे यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय पवार, सचिव कैलास माने, रविंद्र वडे, देविदास भादलकर, चंद्रकांत मोरे राजु पवार, बालाजी मोरे, सचिन पवार,ॲड.विकास पवार, राहुल मोरे, सुमित जसाभाटी,संपत बोरा,केतन वडतिले, पिंटू बोथरा,दिपक पवार, रमेश पवार, आप्पा परदेशी,टिल्लु बिडकर, मयुर पवार, प्रमोद पवार, बबलू जाधव , मंगेश मोरे, गणेश हगवणे आदि मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

  हे मंदिर अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आले असल्याने सदर मंदिराचा जिर्णोद्धार करणे गरजेचे होते. या ठिकाणी नवरात्रीच्या दहाही दिवस नवरात्रीचा उत्सव मोठा असतो. एकंदरच मंदिरात होणारे उत्सव व भाविकांची वाढती गर्दी या पार्श्वभूमीवर मंदिरात जागा अपुरी पडत होती. यामुळे  मंदिर ट्रस्टच्या वतीने या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्टच्या वतीने  भाविकांनी सढळ हाताने मदत करावी.तसेच आर्थिक,वस्तू स्वरूपात बांधकाम साहित्य स्विकारले जातील. असे प्रा.कैलास माने यांनी आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post