महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आयोध्या येथे प्रभू राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतभर व विदेशातही प्रत्येकाला जमेल तसे श्रद्धा भावाने उत्सव साजरे केले. संपूर्ण देशभर घरासमोर भगवी पताका (गुढी) उभारून या सुवर्ण क्षणाचे स्वागत केले. हा सोहळा म्हणजे जणू काय प्रत्येकाच्या मनातला व हृदयात लक्षण होता असे सर्वांना वाटत होते. मग भजन, कीर्तन, सत्संग, पूजा विधि, होम हवणे नामस्मरण असे विविध कार्यक्रम प्रत्येक गावागावात सुरू होते. सायंकाळी सर्वांनीच आपापल्या दारात व प्रत्येक मंदिरात दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. प्रत्येकाच्या दारात सडा रांगोळी केलेली दिसत होती. त्याचाच एक भाग म्हणून जामखेड येथील कन्या विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी कु.स्नेहा शिवाजी लटपटे हिने शिक्षक कॉलनी जामखेड जि.अ.नगर येथील राहत्या घरात भव्य अशी प्रभू रामचंद्र व सीतामाई यांची रांगोळी काढली. तिची ही कलाकृती पाहण्यासाठी शहरातील अनेक भक्त येत होते व प्रभू रामचंद्राच्या विषयी असलेली श्रद्धा पाहून तिचे सर्वजण मनापासून कौतुक करत होते.
स्नेहाचे आजोबा रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक लहू सानप सर यांनी या रांगोळीचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रिकरण करून संग्रहित ठेवले आहे. हा सुवर्णक्षण आपल्या कायम स्मरणात राहावा म्हणून त्यांनी हे चित्रीकरण केले असल्याचे सांगितले. स्नेहाचे आजोबा आप्पासाहेब लटपटे यांनीही आपल्या नातीचे कौतुक केले त्याचबरोबर तिच्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थिनींनीही स्नेहाचे कौतुक केले आहे.
Tags
धार्मिक