प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त जामखेड येथील श्रीराम मंदिरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
22 जानेवारी रोजी श्रीक्षेत्र आयोध्या येथे प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या निमित्ताने सोमवारी संपूर्ण देशभर तसेच विदेशातही सर्व राम मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात उत्सव पार पडणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जामखेड शहरातील श्रीराम मंदिरात उद्या पहाटपासूनच भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

जामखेड शहर व संपूर्ण तालुक्यात गावोगाव उद्या सोमवारी धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड शहरात अतिशय उत्साहाचे वातावरण असून ठीक ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत. घरोघर उद्या गुढी उभारली जाणार आहे. त्याची भक्तांनी तयारी केलेली पाहायला मिळाली. भगव्या ध्वजाच्या खरेदीसाठी नागरिकांची आज गर्दी पाहायला मिळत होती. त्याचबरोबर फुले पूजेचे साहित्य  शोभेचे फटाके खरेदी करण्यासाठी नागरिक आज घराबाहेर पडले होते.

जामखेड शहरातील श्रीराम मंदिरात सोमवारी सकाळी  5.30 वा. अभिषेक होईल.
 ७.०० ते ११.३० वा. पवमान स्वाहाकार,
 सकाळी 11.30 वा. पूर्णाहुती
 दुपारी 12.00 वा. अयोध्येतील श्रीराम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापणा प्रक्षेपण,
 दुपारी 12.20 वा. महाआरती व महाप्रसाद,
3.00 वा. गीत रामायण, भजन (महिला) ,
संध्याकाळी 7.00 वा. श्री रामरक्षा आणि दीपोत्सव 
अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post