खामगांव शाळेत हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : 
जामखेड तालुक्यातील पाटोदा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगांव येथे  गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब यांच्या प्रेरणेने हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 
मनोरंजक खेळ व पैठणीचे बक्षीस हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाईपण भारी देवा हे जमलेल्या सर्व महिलांनी अनुभवले. 

या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून झाली. यावेळी महिला व बालकल्याण अधिकारी ज्योतिताई बेल्हेकर मॅडम यांनी उपस्थित राहून बालमृत्यू,बालविवाह इ.विषयावर सर्वांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. 

केंद्रप्रमुख श्री.विक्रम बडे यांनी या कार्यक्रमाबाबत सर्वांचे कौतुक केले

वंजारवाडी शाळेचे मुख्याध्यापक किशोर बांगर सर
भोसले वस्ती शाळेचे शिक्षक विकास वारे सर.हे ही उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्री. व सौ.  वर्षा धनंजय काळाने ( ग्रा.पं. सदस्य )
श्री. व सौ.राणी शांतीलाल शिरसाठ (ग्रा.पं.सदस्य)
श्री. व सौ.प्रिया  विनोद शिरसाठ (अध्यक्ष  शा.व्य.समिती) समीना रसूल शेख ( उपाध्यक्ष शा.व्य.समिती) श्री व सौ.सोनाली दीपक हुलगुंडे
तसेच गावातील व वाडीतील सर्व  महिला व पालक 
यांनी खूप परिश्रम घेतले.त्यांचे आभार..

श्री.धनंजय काळाने यांनी सर्व माता पालक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहिल्या बद्दल त्यांचे आभार माणून शाळेने खूप छान उपक्रम घेतल्या बद्दल शाळेचे आभार मानले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विनोद शिरसाठ यांनी शाळा व पालक तसेच शिक्षणाचे महत्त्व याविषय मोलचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता सर्वांना गोड जेवण देऊन झाली.

 खेळ पैठणीचा विजेत्या महिला

प्रथम
सौ. पुजा तुषार शिकारे.( तर्फे..वर्षा धनंजय काळणे)

द्वतीय
सौ.राणी शांतीलाल शिरसाठ..( तर्फे..प्रिया विनोद शिरसाठ..)

तृतीय
सौ.सोनाली दीपक हुलगुंडे..( तर्फे समीना रसूल शेख)

हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी खामगांव शाळेचे मुख्याध्यापक *श्री.रामहरी बांगर सर*
तसेच शाळचे शिक्षक
 *श्री.अनुरथ गळगटे  सर*
 *यांनी योग्य नियोजन करून कार्यक्रम सुरळीत पार पाडला*

छोटसे गाव असून सुद्धा खूप महिला,पालक उपस्थित होते.व सर्वांनी अतिशय हिररीने सक्रिय सहभाग घेतला
हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खामगांव,मुसलमानवाडी मधील सर्व माता - पालक,शाळा व्यवस्थापन समिती, सर्व मुले मुली लोकप्रतिनिधी यांचे मोलाचे योगदान लाभले



Post a Comment

Previous Post Next Post