महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
हिंद सेवा मंडळ अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय स्टुडंट टॅलेंट सर्च 2024 परीक्षेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती(शिऊर) या शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
माळीवस्ती शाळेतील इयत्ता चौथीच्या
सारंग प्रदीप झुंजरुक याने जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक मिळविला. श्रेया बळी जायभाय हीने जिल्ह्यात तृतीय तर वेदांत गणेश नेटके या विद्यार्थ्यांने जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळविला.
त्याचबरोबर या शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी तालुका गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले. यामध्ये इयत्ता चौथी सावी सुभाष नेटके (तालुक्यात सर्वप्रथम ) इयत्ता दुसरीतील समर्थ दत्तात्रय माने (तालुक्यात द्वितीय) भक्ती भरत काळे (तालुक्यात द्वितीय) यांचा समावेश आहे.
मुलांच्या गुणवत्तेसाठी श्रीम.पवार मॅडम तसेच मुख्याध्यापक श्री.निंबाळकर सर यांनी खूप मेहनत घेतली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गटशिक्षणाधिकारी श्री. धनवे साहेब, शिक्षणविस्ताराधिकारी श्री.नरवडे साहेब व श्री.जाधव साहेब ,केंद्रप्रमुख श्री.त्र्यंबके साहेब , गणेश नेटके सर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.