केडगावमध्ये बिबट्याचा नगरीकावर हल्ला

 
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : 
अहमदनगर येथील केडगाव मधील लोक वस्तीत बिबट्याचा वावर दिसून आला. बिबट्याला पाहिल्यानंतर नागरिकांनी धावपळ सुरू केली गोंधळलेल्या बिबट्याने एका नागरिकांवर हल्ला केला. सुदैवाने त्या नागरीकाची बिबट्याच्या जबड्यातून सुटका झाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

 अहमदनगर शहरांमध्ये आज शनिवारी दुपारच्या सुमारास बिबट्याचा वावर नागरिकांना दिसून आला या घटनेनंतर नागरिकांनी अंबिका नगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली ज्या ठिकाणी बिबट्या घुसला आहे त्या ठिकाणी नागरिकांनी गोंधळ केला आणि झालेला गोंधळ पाहून बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला एका नागरिकाला बिबट्याने जबर चावा घेतला सुदैवाने उपस्थित असलेले नागरिक त्या व्यक्तीच्या मदतीला धावल्याने बिबट्याने घेतलेल्या चावा व पकड सोडून दिली. 

त्यानंतर वन विभागाने या बिबट्याला मोठ्या अथक परिश्रमातून ताब्यात घेतले आहे


Post a Comment

Previous Post Next Post