संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जमादारवाडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ गड या ठिकाणी आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ वर्षापासून या सप्ताहाचे आयोजन केले जाते. 

सकाळी संत वामनभाऊ महाराज, गहिनीनाथ महाराज व श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीची महापूजा होऊन नऊ वाजता पुण्यतिथी निमित्त भजन सुरू होईल ठीक पावणे बारा वाजता पुष्पवृष्टी होईल व सप्ताहास प्रारंभ होईल.

शनिवारी राजाभाऊ महाराज कुलकर्णी यांचे प्रवचन तर सात ते नऊ या वेळेत श्रीहरी महाराज पुरी आष्टी यांचे कीर्तन होईल. रविवारी दत्ता महाराज खवळे यांचे प्रवचन होईल व सायंकाळी सात ते नऊ आसाराम महाराज बडे आळंदी यांचे कीर्तन होईल. सोमवारी अंगद महाराज ढोले यांचे प्रवचन तर सायंकाळी सात ते नऊ नारायण महाराज दौंड राजुरी यांचे कीर्तन होईल. मंगळवारी अर्जुन महाराज नेटके यांचे प्रवचन तर सायंकाळी शिवचरित्रकार आकाश महाराज भोंडवे यांचे कीर्तन होईल. बुधवारी दत्तात्रय महाराज डुचे यांचे प्रवचन तर राम महाराज शास्त्री आळंदी यांचे कीर्तन होईल. गुरुवारी मच्छिंद्र महाराज राऊत यांचे प्रवचन तर सायंकाळी गहिनीनाथ महाराज खेडकर घाटशील पारगाव यांचे कीर्तन होईल. शुक्रवार दिनांक 14 रोजी दुपारी चार ते सहा दिंडी प्रदक्षिणा व सायंकाळी 9 ते 11  रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव यांचे कीर्तन होईल शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते 11 श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत श्री विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होईल. 

दररोज सकाळी पहाटे चार ते सहा काकडा, सहा ते सात विष्णु सहस्त्रनाम, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, दहा ते बारा गाथा भजन, चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ,  रात्री सात ते नऊ हरिकीर्तन व नंतर हरिजागर. किर्तन संपल्यानंतर दररोज आलेल्या सर्व श्रोत्यांची अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी या संपूर्ण उत्सवाचा लाभ घ्यावा व यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संत वामनभाऊ गड सप्ताह समिती व जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post