केदारनाथ- बद्रीनाथला देवदर्शनासाठी गेल्यावर आलेल्या महाप्रलयात महापुरात सोबतच्या अनेकाना प्राणास मुकावे लागले. दरम्यान पूनरजन्म मिळाल्याने उर्वरित आयुष्य वृद्धांसाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने गेल्या आठ वर्षापासून वृद्धाश्रम चालवणारे ह भ प गहिनीनाथ लोखंडे महाराज यांचं निधन झाल आणि या वृद्धाश्रमातील आजस्थित असलेल्या २९निराधारांचा आधार हरपला.
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान श्री संत माऊली सेवा मंडळ नळी वडगाव ता. भूम येथील ह. भ. प. गहिनाथ महाराज लोखंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवार दिनांक १९/२/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता वृद्धाश्रमावर त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले .
गोरगरीब आणि ज्याला कोणी सांभाळत नाही अशा वृद्धांचा मायबाप असलेला देव माणूस ह. भ. प .गहिनीनाथ महाराज लोखंडे यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्यांच्या निधनामुळे आज स्थितीत २९ वृद्ध पोरके झाले.
जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वै. लोखंडे महाराज यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की
"मी 2016 साली आमच्या नातूच्या वाढदिवसानिमित्त या गडावर गेलो एकंदरीत परिस्थिती पाहता पाणी नाही लाईट नाही राहण्यास छप्पर नाही अशा वेळेस मी काही मदत करू लागलो
जिल्हा सत्र न्यायाधीश भूम जयराज वडणे यांनी सुद्धा त्यांच्या आईच्या स्मरणार्थ खूप मदत केली आणि जामखेड येथील कांतीलाल कोठारी, आनंद कोठारी,सुनील कोठारी , पांडू राजे भोसले, सागर गुंदेचा,प्रफुल्ल सोळंकी, रोहिदास केकान,मिलन कांकरिया, अमोल लोहकरे, गणेश देवकाते,प्रवीण छाजेड, प्रवीण मंडलेचा, गणेश रुपनर, ह भ प दीपक महाराज गायकवाड, ओंकार दळवी, श्रीकांत सिकेतोड, विकास जाधव , भूम पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. मंगेश साळवे, एडवोकेट रवींद्र गुळवे आदींनी वेळोवेळी मदत केली.
एखादी अंगणवाडी , बालवाडी, महाविद्यालय, एखादं दुसरं शैक्षणिक संकुल चालवायचं म्हटलं तर अनुदान असल्याशिवाय, शासनाची मदत असल्याशिवाय चालवता येत नाही , त्याचप्रमाणे दिव्यांग शाळा, अनाथाश्रम, बालकाश्रम , वृद्धाश्रम अशा प्रकारचं युनिट चालवायचं म्हटलं तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक चंणचण निर्माण होते . शासनाच्या मदतीविना अशी युनिट चालवणे शक्यच नाही.
परंतु तरी देखील भूम तालुक्यात नळी वडगाव फाटा या ठिकाणी असलेले ह भ प गहिनीनाथ लोखंडे महाराज गेल्या आठ ते नऊ वर्षापासून शासनाच्या मदतीविना श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाच्या माध्यमातून वृद्धाश्रम चालवत आहेत , या वृद्धाश्रमामध्ये आज स्थितीत महिला व पुरुष असे जवळपास २९ वृद्ध आहेत.
या सर्वांची सुश्रुषा, त्यांचं निरोगी आरोग्य, दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारी व्यवस्था या सगळ्या सुविधा कमी पडू न देता लोखंडे महाराज यांनी स्वतः वयाची ७५वर्ष उलटली असली तरी नवतरुणांना लाजवेल अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या मोटर सायकलवर दोन बाजूला दोन गोण्या टाकायच्या . तालुक्यातील ईट, वालवड, आंबी , पाथरूड, भूम , माणकेश्वर अशा गावी जाऊन आठवडी बाजारात जाऊन स्वतः माधुकरी मागायची आणि या भिक्षुकीच्या आधारावर वृद्धाश्रमातील सर्वांना सेवा पुरवण्याचे काम आज स्थितीला संत गाडगे बाबांच्या रूपात सेवा पुरवण्याचे काम लोखंडे महाराजांनी केलेल आहे .
या लोखंडे महाराजांची तळमळ, त्यांचे प्रयत्न, त्यांचं वय, त्यांची धडपड, सातत्यपणा विचारात घेता जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, भूम येथील पत्रकार शंकर खामकर, पाटसांगवी येथील प्रल्हाद आडागळे सह अनेकांनी मदतीचे हात लोखंडे महाराजांना दिले होते . एकमेकांच्या वैचारिक मदतीच्या बळावर महाराजांना वृद्धाश्रम चालवण्यासाठी बळ मिळत होतं .
आणि तेवढ्याच प्रेरणेने गहिनीनाथ लोखंडे महाराज वृद्धाश्रम चालवण्याचा प्रयत्न करत होते .
महाराजांची सेवा . तत्परता विचारात घेता आदर्श मुख्याध्यापक सोमनाथ टकले सर यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात अवास्तव खर्च टाळून सर्व वृद्धांना भरपोशाख नवे कपडे घेऊन दिले होते . याच सरांनी नातेवाईक असलेल्या मुलींच्याही लग्नात पुन्हा एकदा अशाच प्रकारची मदत करून महाराजांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता ' वैशिष्ट्ये या वृद्धाश्रमाची म्हणजे कोरोना महामारीच्या काळात भल्याभल्यांना पछाडलं होतं . कोरोना महामारीच्या काळात देखील या वृद्धाश्रमातील एकाही वृद्धांना स्पर्श केला नाही . अगदी आरोग्य विभागाच्या देखभालीमध्ये सर्व वृद्ध सुखरूप राहिले होते . किंबहुना त्यांची तेवढी लोखंडे महाराजांनी काळजी घेतली होती हेच आवर्जून सांगण्या सारख आहे .
जामखेड येथील उद्योगपती असलेले संजय कोठारी हे त्यांचा स्वतःचा, मुला, मुलीचा आणि लग्नाचा वाढदिवस किंवा वडिलांचे वर्ष श्राद्ध देखील याच वृद्धाश्रमात आवर्जून करत असत, याशिवाय जवळपासच्या डॉक्टरांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देखील देण्याचा प्रयत्न कोठारी यांनी केला आहे , आता गहिनीनाथ लोखंडे महाराज यांच्या पश्चात वृद्धाश्रमाचा रथ पुढे कायम चालू ठेवण्यासाठी महाराजांच्या पत्नी श्रीमती कोणताबाई लोखंडे यांच्या सहकारी श्रीमती गोदावरी झाडबुके आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांना गावकऱ्यांनी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याची गरज आहे .कारण आज स्थितीत मागतकरी मागून ज्या २९ वृद्धांचा चरितार्थ लोखंडे महाराज भागवत होते तो आधार नाहीसा झाला आहे . यामुळे या वृद्धांना यापुढे आधार देण्यासाठी सामाजिक संस्था . सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देणे काळाची गरज झाली आहे .
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची वेळोवेळी वृद्धाश्रमात मदत
पाण्यासाठी बोर घेण्यास मदत,
शेड उभारण्यासाठी, फरशी ची मदत वृक्षारोपण अन्नधान्य अशा अनेक प्रकारे मदत केली परंतु बाबा केल्यामुळे खूप हळहळ व्यक्त केली