'स्टुडंट टॅलेंट' परीक्षेत हिंदवी अरण्य व आलोक कौले यांचे यश


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
हिंद सेवा मंडळ अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय स्टुडंट टॅलेंट सर्च 2024 या घेण्यात आलेल्या परीक्षेत.
कु. हिंदवी चंद्रकांत अरण्य इ.तिसरी जि.प.प्राथ.शाळा खर्डा मुली.
हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला तर
चि. आलोक ज्ञानेश्वर कौले इ. चौथी
जि.प.प्राथ.शाळा बारगजेवस्ती (नागोबाचीवाडी) याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

या दोन्ही विद्यार्थ्यांचे तसेच अलोकचे वर्गशिक्षक श्रीमती मोहिते अनिता अंबादास हिंदवी चे वर्गशिक्षक श्रीमती मानेकर सुवर्णा यांचे खर्डा परिसरातून कौतुक होत आहे.

खर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री केशव तात्या गायकवाड साहेब व कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब यांनी हिंदवी व आलोक तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे अभिनंदन केले.


Post a Comment

Previous Post Next Post