जामखेड प्रतिनिधी : जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ गड या ठिकाणी सूरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने शनिवारी सांगता होईल.
संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ वर्षापासून जमादारवाडी येथे भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे ज्या वेळेला पुष्पवृष्टी केली जाते त्याच दिवशी जमादारवाडी ठिकाणी सप्ताहाचा आरंभ होतो. त्याप्रमाणे 3 फेब्रुवारी पासून येथे सप्ताहास प्रारंभ झाला.
शनिवारी राजाभाऊ महाराज कुलकर्णी यांचे प्रवचन तर श्रीहरी महाराज पुरी आष्टी यांचे कीर्तन झाले. रविवारी दत्ता महाराज खवळे यांचे प्रवचन व आसाराम महाराज बडे आळंदी यांचे कीर्तन झाले. सोमवारी दादासाहेब महाराज सातपुते यांचे प्रवचन तर नारायण महाराज दौंड राजुरी यांचे कीर्तन झाले. मंगळवारी अर्जुन महाराज नेटके यांचे प्रवचन तर शिवचरित्रकार आकाश महाराज भोंडवे यांचे कीर्तन झाले. बुधवारी दत्तात्रय महाराज डुचे यांचे प्रवचन तर राम महाराज शास्त्री आळंदी यांचे कीर्तन झाले. गुरुवारी मच्छिंद्र महाराज राऊत यांचे प्रवचन तर सायंकाळी गहिनीनाथ महाराज खेडकर घाटशीळ पारगाव यांचे कीर्तन झाले. शुक्रवारी दिनांक 9 रोजी दुपारी चार ते सहा दिंडी प्रदक्षिणा झाली.
शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.
तरी या कार्यक्रमाचा तालुक्यातील भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत वामनभाऊ गड सप्ताह समिती व जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.