विद्यार्थ्यांकडून जामखेड मध्ये वाहतूक रस्ता सुरक्षा जनजागृती

जामखेड प्रतिनिधी :- 
प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश संकुलामध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले.
     
      यावेळी प्रमुख उपस्थिती सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक चेतन दासनूर व सहाय्यक निरीक्षक प्रियंका चोथे , प्राचार्य मडके बी के  मुख्याध्यापिका चौधरी के डी,  पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, सौ साळुंखे एम बी , श्रीम ससाणे व्ही एस, श्रीम शिंदे ए ए, एनसीसी ऑफिसर मयुर भोसले सांगळे ए एम आदी मान्यवर उपस्थित होते. 
    यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक चेतन दासनूर म्हणाले शाळा नैतिक मूल्य घडवण्याचा कारखाना आहे. विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. सर्वांनी गाडी चालवताना हेल्मेट चा वापर करावा, एका वर्षाला दीड लाख एक्सीडेंट होतात .विद्यार्थी जीवनातच वाहतुकीचे रस्ता नियम व सर्वांनी अंगीकृत करावेत .चालताना उजव्या बाजूने चालावे मोबाईलचा वापर करू नये
सहाय्यक निरीक्षक प्रियंका चोथे  यांनी सांगितले 
 अठरा वर्षाखालील मुलांनी गाडी चालवू नये.
मुलांनी पालकांना हेल्मेट घालण्याची सक्ती करावी. गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर करू नये. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम आपल्या घरी सांगावेत .जीवन अनमोल आहे 

     यावेळी नागेश विद्यालय एनसीसी कॅडेट रस्ता सुरक्षा रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
        रॅली मार्ग नागेश विद्यालय- बीड रोड- बाजारतळ -खर्डा चौक- अशा मार्गाने जनजागृती केली तसेच खर्डा चौक येथे रस्ता सुरक्षा पथनाट्य सादरीकरनात मोबाईलचे दुष्परिणाम, हेल्मेटचा वापर करावा, अठरा वर्षाखालील मुलांनी गाडी चालवू नये ,वाहतूक नियमांचे पालन करावे असे नाटिकेतून सादरीकरण केले. पोलीस विभागाचे सहाय्यक फौजदार लहू यादव, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गंगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण, होमगार्ड रफिक तांबोळी, किरण बांदल,पावर एच बी यांचे सहकार्य लाभले.
    खर्डा चौक येथे  सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक चेतन दासनूर व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका चोथे यांनी ग्रामस्थ वाहन चालक यांना वाहतुकी नियम संदर्भात मार्गदर्शन केले. 
        पथनाट्य सादरीकरण मयूर भोसले यांचे मार्गदर्शनाखाली झाले. 
    विद्यार्थी व शिक्षकांना वाहतूक नियमांचे पत्रक  देण्यात आले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन सोमनाथ गर्जे यांनी केले.
        

Post a Comment

Previous Post Next Post