महाराष्ट्र न्यूज नेटवर्क: वाकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींसाठी, सध्या “राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत” तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा या केंद्रातील वाकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या उपक्रमाच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे,विस्तार अधिकारी मा.श्री.संजय नरवडे साहेब, केंद्रप्रमुख मा.श्री.केशव तात्या गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाकी शाळेचे मुख्याध्यापक श्री.मुकुंदराज सातपुते श्री.संतोष डमाळे,लक्ष्मण वटाणे,शरद पाचारणे, विठ्ठल घोडे,मनिषा शेंदूरकर, श्री.मारुती गिते यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे.
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' प्रशिक्षण योजनेचे तालुकाप्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे व सौ. सविता संतोष बारगजे हे याशाळेतील मुलींना तायक्वांदोचे शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर ओम बारगजे हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत.
Tags
तायक्वांदो