जामखेड प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त जामखेड येथील श्रीशैल्यमल्लिकार्जुन मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जामखेड शहरातील सुतार नेट (गल्ली) येथील श्रीशैल्यमल्लिकार्जुन मंदिरात गेल्या सात वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. आज सप्ताहास प्रारंभ झाला. यावेळी पृथ्वीराज संपत राळेभात, सुमित कैलास सुतार व सौ. अमृता सुमित सुतार यांच्या हस्ते विधिवत पूजा व महाआरती करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. विनापुजन कुमार सर राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आले व गाथा भजन करून सप्ताह प्रारंभ झाला. यावेळी भजनी मंडळाचे पंढरीनाथ महाराज राजगुरू गायनाचार्य ईश्वर महाराज तौर, सिताराम राळेभात, संतोष पाटील, सुमित सुतार, जगन्नाथ धर्माधिकारी, संतोष बारगजे बाळासाहेब महाराज गाडे यांनी सुश्राव्य भजन केले.यावेळी संपत (नाना) राळेभात, दिलीपकुमार राजगुरू सर,आनंद राजगुरु,अंकुश राजगुरु, रंगनाथ राजगुरू,नारायण राजगुरु, भगवान राजगुरू,दिनेश मोहळकर सर,गणेश चिंचकर, गणेश घोरपडे उध्दव आजबे पत्रकार संजय वारभोग
या सप्ताहामध्ये पहाटे चार ते सहा काकडा भजन सहा ते सात महापूजा आठ ते दहा शिवलीलामृत पारायण, 11 ते 12 गाथा भजन, दोन ते पाच महिला भजन, साडेपाच ते साडेसहा हरिपाठ, सात ते नऊ हरिकीर्तन व नंतर आलेल्या सर्व श्रोत्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
आळंदी देवाची येथील ईश्वर महाराज तौर व पंढरीनाथ महाराज राजगुरू हे व्यासपीठ चालक म्हणून काम पाहणार आहेत. या सप्ताहामध्ये रविवार दिनांक 3 मार्च रोजी सखाराम महाराज जाधव आळंदी, सोमवार दिनांक 4 मार्च ज्ञानेश्वर महाराज नगरे आळंदी, मंगळवार दिनांक 5 मार्च अशोक महाराज भोसले आळंदी, बुधवार दिनांक ६ मार्च नारायण महाराज दौंड राजुरी, गुरुवार दिनांक 7 मार्च निळकंठ महाराज विभूते (गुरुजी), शुक्रवार दिनांक आठ मार्च भानुदास महाराज खोले गोमळवाडा संस्थान, शनिवार दिनांक 9 मार्च बबन महाराज बहिरवाल मदन महाराज संस्थान कडा यांची कीर्तने होतील रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी दहा ते बारा अरुण महाराज पुंडे राशीन यांचे काल्याचे किर्तन होईल व यानंतर महाप्रसादाने संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल.