महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. वेळप्रसंगी मुलींना स्वतःचे रक्षण करता यावे व त्यांना व्यायामाची सवय लागावी यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते.
जामखेड तालुक्यातील लोणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे साहेब. विस्तार अधिकारी संजय नरवडे , केंद्र प्रमुख सुरेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे मुख्याध्यापिका श्रीमती.बांगर सुनंदा, श्री.साबळे शंकर, श्रीमती.बांदल सुरेखा यांच्या मार्गदर्शनाखाली राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे व सौ. सविता संतोष बारगजे येथील विद्यार्थिनींना तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.
जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत. या प्रशिक्षणामध्ये मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.
Tags
तायक्वांदो