महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. स्वसंरक्षणार्थ राबवल्या जाणाऱ्या या योजनेतील डावपेच येथील विद्यार्थिनींनी अतिशय उत्तम प्रकारे आत्मसात केले.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , विस्तार अधिकारी सुनील जाधव, केंद्र प्रमुख विक्रम बडे, पिंपरखेड शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रवीण शिंदे , सुभाष सरोदे, रवींद्र इंगुले , अंगद कोथमिरे , भगवान साळुंखे , श्रीमती सुशीला जरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेत प्रशिक्षण दिले जाते.
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे व अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण हे येथील विद्यार्थिनींना तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत. या प्रशिक्षणामध्ये मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.
Tags
तायक्वांदो