नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जामखेड तालुक्यातील नऊ विद्यार्थ्यांची निवड



जामखेड प्रतिनिधी 
जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या प्रेरणेतून व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्याच्या वाढत्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून जवाहर नवोदय विद्यालयाच्या पात्रता परिक्षेत तालुक्यातील तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत आपला प्रवेश निश्चित केला आहे. 


जामखेड तालुक्यातील नवोदय प्रवेश परिक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे 
१) सायली रामहरी जगताप, जि. प. प्राथमिक शाळा कुसडगाव 
२) आदित्य अभिमान घोडेस्वार, जि. प. प्राथमिक शाळा पवार वस्ती 
३) शौर्य विकास हजारे, जि. प.प्राथ.शाळा हळगाव 
४) अर्णव सुभाष ओमासे, जि. प. प्राथमिक शाळा पिंपरखेड 
५) अर्णव चंद्रकांत गाडेकर जि. प. प्राथमिक शाळा वाघा 
६) शौर्य ब्रह्मदेव हजारे, जि. प. प्राथमिक शाळा सारोळा 
७) उत्कर्ष रामेश्वर ढवळे, जि. प. प्राथमिक शाळा पवार वस्ती 
८) शिवसंस्कार दशरथ बिरंगळ, जि. प. प्राथमिक शाळा जि. प. प्राथमिक शाळा बोराटे मोहिते वस्ती 
९) सोहम रामनाथ ढाकणे. न्यू इंग्लिश स्कूल खर्डा

 नगर जिल्ह्यात प्रवेश पात्र एकुण ८० विद्यार्थ्यांपैकी जामखेड तालुक्यातील ९ विद्यार्थी म्हणजे एकुण १० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थांची निवड झाली आहे. जामखेड तालुक्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी, गटअधिकारी प्रकाश पोळ गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व मार्गदर्शक शिक्षिकांचे तालुक्यातील शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन होत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post