महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथील विद्यार्थिनींना तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामुळे येथील मुलींचा आत्मविश्वा वाढला आहे.
जामखेड तालुक्याक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील जाधव साहेब, केंद्रप्रमुख विक्रम बडे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच डोणगाव शाळेचे मुख्याध्यापक रामदास गंभीरे सर , संभाजी कोकाटे सर,शिवाजी घोडके सर, भानुदास फूलमाळी सर, नीलिमा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू आहे.
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे व त्यांचे सह प्रशिक्षक येथील विद्यार्थिनींना तंत्रशुद्ध व्यायाम प्रकार व तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
जामखेड तालुक्यामध्ये इतर शाळेवर, ज्ञानेश्वर जमदाडे, संकेत जमदाडे, कु.तनिष्का डाडर, श्वेता रासकर ओम बारगजे हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत.
Tags
तायक्वांदो