जि.प.प्राथ.शाळा ,जायभायवाडी येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांसाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम गरजेचे -- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्याच्या मनात दडलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळण देऊन काहीतरी नावीन्यपूर्ण घडविण्याचा प्रयत्न करावा.शिक्षणाबरोबरच संस्कार ही नितीमुल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम जायभायवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक करत आहे.शाळेची वाटचाल ही प्रगती पथावर आहे.असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी व्यक्त केले ते जायभायवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होते.

    दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व मान्यवरांच्या हस्ते करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध नृत्याचे कार्यक्रम सादर केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गाणी, स्वागत नृत्य,धार्मिक, आधुनिक नृत्यप्रकार,बहुभाषिक गीतगायन , देशभक्तीपर गीत, सिनेमागीते, मराठी लोकगीते, नाटिका सादर करून तसेच आपल्या अभिनयातून उपस्थितांची मने विद्यार्थ्यांनी जिंकली. तसेच मिशन आरंभ स्पर्धेत ७ पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र देऊन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , केंद्र प्रमुख राम निकम,शिक्षक नेते किसन वराट, नवनाथ बहीर,जायभायवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक - सपकाळ सर शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष - विष्णू गायकवाड ,उपाध्यक्ष - संतोष जायभाय आदी सदस्य शिक्षक भोसले सर,राठोड सर ,भालेराव सर,गाढे सर,अशोक जाधव सर,सुशेन चेटमपल्ले,रविंद्र धस ,चंद्रकांत अरण्ये सर,मनोज धस आदी जायभायवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व संभाजीराव थोरात यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन संपूर्ण कार्यक्रमासाठी २००० हजार रुपये बक्षीस देण्यात आले. 
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालेराव गणेश सर तर आभार प्रदर्शन सपकाळ सर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post