तपनेश्वर हनुमान मंदिरात श्रीराम जन्म उत्सव साजरा करुन सप्ताहास प्रारंभ

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क: राम नवमी निमित्त जामखेड शहरातील तपनेश्वर येथील हनुमान मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पुढील सात दिवस येथे दासबोध पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
सालाबाद प्रमाणे येथे राम जन्मोत्सव साजरा करून सप्ताह प्रारंभ होतो व हनुमान जन्म साजरा करून दुसऱ्या दिवशी सप्ताहाची सांगत होते. बुधवारी येथे ह. भ. प. कैलास महाराज भोरे यांचे राम जन्माचे कीर्तन झाले व या सप्ताहास प्रारंभ झाला. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत अशोक महाराज चिंचपूरकर यांचे कीर्तन झाले. 

आज दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ह. भ. प. मनोहर महाराज इनामदार सर यांचे कीर्तन होईल. 

शुक्रवारी डॉ. अमित डोके मातकुळी शनिवारी ह भ प बाबर महाराज भूम, रविवारी श्रीहरी महाराज पुरी आष्टी, सोमवारी ह भ प विश्वनाथ महाराज ननवरे अरणगाव, मंगळवारी हभप अरुण महाराज पुंडे राशीन यांची कीर्तने होतील. मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता भजन करून हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. दुपारी चार ते सहा दिंडी मिरवणूक सोहळा होईल व बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हभप पांडुरंग महाराज लोमटे धाराशिव यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल. 

या सर्व कार्यक्रमाचा शहरातील व पंचक्रोशीतील भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन तपनेश्वर हनुमान मंदिर ट्रस्ट व सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post