जामखेड प्रतिनिधी
जवळा तालुका जामखेड प्रवीण मंडलेचा यांच्या बहिण सौ स्वाती विजय मालू यांचे सासरे श्रीमान प्राध्यापक बालचंदजी रामचंद्रजी मालू वय ८४ हे २८ एप्रिल २०२४ रोजी उत्तर प्रदेश मधील मेरठ या ठिकाणी जैन दीक्षा घेणार आहेत.
दीक्षार्थी बालचंद मालू हे पुणे येथील विजय मालू यांचे पिताश्री आहेत. श्रमण संघाचे सल्लागार राजर्षी तपस्वीरत्न गुरुदेव सुमतीप्रकाशजी उपाध्यक्ष प्रखर वाचनाचार्य डॉक्टर विशालमुनिजी तसेच उत्तर भारतीय प्रवर्तक राष्ट्रसंत आशिषमुनीजी म.सा.यांच्या सानिध्यात जैन संत होणार आहेत.
दीक्षार्थी मालू हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत उपाध्यक्ष प्रवीणरूषिजी प्रवर्तक अशीषमचु यांच्या चातुर्मासमध्ये दैनंदिन प्रवचनाचे संकलन करून वृत्तपत्रातून प्रसिद्धी देण्याचे काम त्यांनी केले वर्तमानपत्रातील प्रवचन मालिकेवर स्वखर्चाने ऋषीवचन व अशीषधारा ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. गत पाच वर्षापासून परमपूज्य आशिषमुनीजी म.सा. यांच्यासोबत वास्तव्यास असून जैन तत्वाचा अभ्यास करीत आहेत. २८ एप्रिल रोजी मेरठ उत्तर प्रदेश येथे दीक्षा ग्रहण करून जैन मुनि होणार आहेत. या दीक्षा महोत्सवास नगर जिल्ह्यातील सकल जैन समाजातील लोकांनी उपस्थित राहावे असे अहवाल सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांनी केले आहे.
दीक्षार्थी बालचंदजी मालू यांना जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,मनोज दुगड, प्रवीण मंडलेचा, सुनील चोरडिया, कांतीलाल कोठारी, महावीर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक चोरडिया ,सुभाष भळगट , भारतीय जैन संघटना जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी , भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष अमोल तातेड, राहुल राखेचा, अनिल फिरोदिया ,बाळासाहेब रोडे ,संतराम सुळ आदींनी शुभेच्छा दिल्या.