मुरलीधर महाराज बारगजे यांच्या काल्याच्या किर्तनाने पिंपळनेर येथे सप्ताहाची सांगता

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:- 
 पिंपळनेर तालुका शिरूर कासार हनुमान मंदिर लालपुरी येथे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची ह. भ. प. मुरलीधर महाराज बारगजे यांच्या काल्याच्या किर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली. या सप्ताहासाठी परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. 

  शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे श्री हनुमान संस्थान लालपुरी या ठिकाणी 1986 सालापासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे. लालपूरी, पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथे भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते. या उत्सवाला श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज तसेच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप परमेश्वर महाराज जायभाये यांनी भेट दिली. 

  १६ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह भ प बाबासाहेब महाराज बडे वारणी, ह भ प परशुराम महाराज मराडे तळेगाव बीड, महामंडलेश्वर त्रिवेंद्रानंद सरस्वती महाराज इंदुवासिनीदेवी संस्थान पिंपळनेर, ह. भ. प. रोहिदास महाराज शास्त्री हातोला, ह. भ. प. महेश महाराज साळुंखे मुंबई, ह. भ. प. मधुसूदन महाराज गवारे पिंपरीगवारे, ह. भ. प. विक्रांत महाराज वाडेकर यांची कीर्तने झाली. तसेच श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ह. भ. प. बांगर महाराज भायाळा तर हनुमान जयंती निमित्त पहाटे ह. भ. प. पंढरीनाथ महाराज डोंगर जाटनांदुर यांची कीर्तने झाले. 

  २३ एप्रिल रोजी सकाळी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे परीक्षक तथा गाथामूर्ती ह. भ. प. मुरलीधर महाराज बारगजे यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण उत्सवाची सांगता झाली. कीर्तनानंतर दिंडी प्रदक्षिणा झाली यावेळी श्री मारुती बाजीराव बारगजे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपळनेर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तांनी किर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. 



Post a Comment

Previous Post Next Post