जवळका शाळेतील मुलींनी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत गिरवले तायक्वांदोचे धडे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत जवळका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी तायक्वांदो या खेळाचे धडे गिरवले आहेत. 

जामखेड तालुक्यात राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत मुलींसाठी तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण सुरू होते. गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब , विस्तारअधिकारी श्री.संजय नरवडे केंद्रप्रमुख श्री.त्र्यंबके साहेब आदींच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले. 

जामखेड तालुक्यातील सोनेगाव केंद्रातील जवळका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, मुख्याध्यापक दत्तात्रय कोल्हे सर, बापूराव हजारे सर, शिंदे सर, लव्हाळे सर, श्रीमती काटकर मॅडम, श्रीमती बनसोड मॅडम आदींच्या मार्गदर्शनाखाली राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे व ओम बारगजे यांनी येथील विद्यार्थिनींना तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण व विविध व्यायामाचे प्रकार शिकविले. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी हे स्वसंरक्षण प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आले. 

 या प्रशिक्षणामुळे मुलींना व्यायामाची सवय लागली आहे. तायक्वांदो सारखे प्रशिक्षण घेतल्यामुळे गरज पडल्यास त्या स्वतःचे रक्षण स्वतःच करू शकतील. ग्रामीण भागातील मुलींना अशा प्रशिक्षणाची गरज आहे. 





 

Post a Comment

Previous Post Next Post