जामखेड प्रतिनिधी
प.पू.आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृतिदिना निमित्त भव्य ॲक्युप्रेशर सुजोग थेरपी शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप गायकवाड म्हणाले कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांचे मी गेली तीस वर्षापासून कार्य पाहत आहे खरोखर समाजासाठी झटणारी व्यक्ती म्हणजे संजय कोठारी म्हणावे लागेल
यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडू राजे भोसले म्हणाले संजू काका कोठारी यांचे कार्य मी लहानपणापासून पाहत आहे खरोखर खूप चांगल्या प्रकारे ते समाजसेवा करतात आम्हाला नेहमी मदत करतात महत्त्वाचे म्हणजे आमच्या गौशाळेस दर उन्हाळ्यामध्ये आणि प्रत्येक वेळी ते हिरवा चारा देत असतात असे शिबिर खूप घेत असतात लोकांच्या हिताचे कार्य संजय काका कुठेही करत असतात त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा
जामखेड येथील कै सुवालाल भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठान आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने परमपूज्य आचार्य सम्राट
आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृती दिनानिमित्त भव्य ॲक्युप्रेशर सुजोक थेरपी शिबिर ७ दिवसासाठी ठेवण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉक्टर प्रताप गायकवाड होते तरकार्यक्रमाचे उद्घाटन महेंद्र प्रकाश बोरा यांच्या हस्ते केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कांतीलाल कोठारी उद्योजक, डॉक्टर अमोल भगत एम.बी.बी.एस. एम.डी. मेडिसिन, विनोद बेदमुथा सदस्य जैन श्रावक संघ, जितेंद्र बोरा सदस्य जैन श्रावक संघ ,पांडूराजे भोसले अध्यक्ष श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड,प्रवीण शेठ छाजेड उद्योजक , ,ॲड. नवनीतलाल बोरा , मनोज दुग्गड उद्योजक ,संतोष गुंदेचा, सुभाष भळगट, अशोक चोरडिया साखर सम्राट ,सुभाष भंडारी, प्रफुल्ल सोळंकी, सुमित चाणोदिया, सुनील जगताप ,राहुल घोरपडे, अनिल फिरोदिया ,ऋषिकेश,( बिट्टू ) मोरे ,संतराम सुळ , मिठूलाल नवलाखा, साहिल भंडारी,हे उपस्थित होते
डॉ. राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थेचे डॉक्टरांद्वारे उपचार .
डॉ. आर. पी. भाटी एम.डी.ॲक्यु प्रेशर थेरपी महेंद्र पितानी हे करणार आहेत तसेच ॲक्युप्रेशर ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ॲक्युप्रेशर पॉईंट हाताच्या व पायाच्या तळव्यावर असतात जेव्हा आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवायाला आजारपण येते तेव्हा ते पॉईंट बिघडलेले असतात या पॉईंटवर ॲक्युप्रेशर सुजोग थेरपी या उपचाराच्या पद्धतीने प्रकृती हळूहळू सुधारत आजार विना औषधाने बरा होतो तसेच रक्तप्रवाह सुरळीत होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढते व रुग्णास बरे वाटू लागते सर्व समाजातील वयोगटातील स्त्री-पुरुषांचे सर्व आजारावर नैसर्गिक पद्धतीने उपचार होणार आहेत तरी सर्व समाजातील रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा यासाठी सात दिवसाच आलेली आहे तसेच शिबिर रविवार दि. ७/४/२०२४ ते शनिवार दि. १३/४/२०२४ पर्यंत सकाळी ८=०० (आठ) ते १२=००(बारा )आणि दुपारी ४=००(चार) ते ४=००(आठ) वाजेपर्यंत होणार आहे शिबिर महावीर भवन नगर रोड जामखेड येथे चालू आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राहुल राखेचा यांनी दिली