जि.प. सारोळा शाळेत 'राणी लक्ष्मीबाई' प्रशिक्षण उत्साहात संपन्न

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. 

    जामखेड तालुक्यातील राजुरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब ,विस्तार अधिकारी सुनील जाधव साहेब केंद्रप्रमुख सुरेश मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण झाले. 

    जि प प्राथ शाळा सारोळा शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख माजीद गुलाब, श्री लिमकर राहुल बब्रुवान
श्रीम शेख शबाना माजीद, श्री सोळंके खंडेराव मधुकर, श्री होळकर प्रशांत राजेंद्र, श्रीम रसाळ अमृता केदार यांच्या मार्गदर्शनाखाली कु. श्वेता रासकर  यांनी शाळेमध्ये  विद्यार्थिनींना तंत्रशुद्ध व्यायाम प्रकार व स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले. 

    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी हे स्वसंरक्षण प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आले. 

Post a Comment

Previous Post Next Post