जि. प. वाघा शाळेत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण उत्साहात संपन्न

    महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघा येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. 

    गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब,विस्तारअधिकारी श्री.संजय नरवडे केंद्रप्रमुख श्री.त्र्यंबके साहेब, तसेच मुख्याध्यापक श्री.संजय हजारे सर,श्री. गणेश नेटके सर,श्री. कानिफनाथ हजारे सर,श्री. सस्ते सर या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक ओम बारगजे यांनी येथील विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण दिले. 

    स्वसंरक्षण योजनेतील तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण मिळाल्याने मुलींनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .या कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आला. 








Post a Comment

Previous Post Next Post