जामखेड शहरातील छायाचित्रकार सुनिल उर्फ (दादा) कलासागर कासार यांचे समर्थ हाॅस्पिटल येथे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले.
लोकसभा निवडणूक छायाचित्रणासाठी गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थवाटू लागले. त्यानंतर, तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आल़े मात्र, उपचारादरम्यानच सुनिल उर्फ दादा (कलासागर) कासार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील असा परिवार आहे.
रविवारी दुपारी 1:00 वाजता शहरातील तपनेश्वर येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
चालता बोलता अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.