महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जामखेड येथे 30 एप्रिल पासून गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालक संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या संस्थेचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या सेवा केंद्राच्या माध्यमातून येथे दररोज नित्य सेवा त्रिकाल आरती, होम हवन, नामस्मरण पारायण प्रश्नोत्तराचे कार्यक्रम वर्षभर सुरू असतात.
30 एप्रिल पासून सहा मे पर्यंत जामखेड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप व गुरुचरित्राचे पारायण होणार आहे तरी या सप्ताहाचा तालुक्यातील व परिसरातील सेवेकर्यांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने पारायणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.