अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेडची नोंद.


अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेडची नोंद.

जामखेड प्रतिनिधी 
जगातील सर्वात मोठे मानवी  रचनेतील भारताच्या नकाशाची प्रतिकृती रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड येथील श्री नागेश विद्यालयामध्ये साकार झाली आहे.  नागेश विद्यालयाच्या या प्रतिकृतीची अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होऊन जामखेडचे नाव जागतिक पातळीवर चमकले आहे. अशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र, मेडल गिफ्ट बॉक्स मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२)  प्रदान करण्यात येणार आहे.

 २६ जानेवारी  रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त जगातील सर्वात मोठे मानवी  रचनेतील भारताच्या नकाशाची प्रतिकृती  रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये साकार झाले आहे. यामध्ये अडीच हजार विद्यार्थी व १७ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी कॅडेट सहभागी झाले. त्याचे मोजमाप लांबी २४० रुंदी २२५  फूट होते. तर क्षेत्रफळ ५४ हजार  स्क्वेअर फुट व वर्तुळाकार रचनेची  त्रिज्या १०१ फूट व क्षेत्रफळ ३२ हजार ३१ स्क्वेअर फुट आहे. या वर्तुळाकार चित्रात विद्यार्थी बैठक रचनेत भव्य भारताचा नकाशा तसेच जयहिंद  जयभारत नाव साकारले. ७५ वा प्रजासत्तक दिन अमृत महोत्सवाचे  निमित्त साधून ७५ मीटर तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला आहे. 

अशिया बुक ऑफ रेकॉर्डने १९ मार्च  रोजी निश्चित केले आहे.  तशी नोंद वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी सलग्न अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.  

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आ रोहित  पवार, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे  व नाईकवाडी, विद्यालयाचे प्राचार्य बी के मडके, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, राजेंद्र कोठारी , प्रा. मधुकर राळेभात, विनायक राऊत, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, अशोक यादव, अमोल बहिर,  महाराष्ट्र बटालीयचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग यांनी अभिनंदन केले आहे. 

 
 

Post a Comment

Previous Post Next Post