बारगजेवस्ती शाळेचा आलोक कौले मंथन परीक्षेत राज्यात पाचवा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारगजेवस्ती येथील चौथीतील विद्यार्थी चि.आलोक ज्ञानेश्वर कौले याने राज्यस्तरीय मंथन परीक्षेत 300 पैकी 288 गुण मिळवत राज्यात 5 वा क्रमांक व जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

जामखेड तालुक्यातील खर्डा या केंद्रातील बारगजे वस्ती शाळेचा विद्यार्थी चि.आलोक ज्ञानेश्वर कौले इ.4थी याने राज्यस्तरीय मंथन परीक्षेत 300 पैकी 288 गुण मिळवत राज्यात 5 वा क्रमांक व जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आलोकला मुख्याध्यापक श्री.सचिन देशमाने वर्गशिक्षक श्रीमती मोहिते अनिता अंबादास यांचे मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब,विस्तार अधिकारी श्री. नरवडेसाहेब,जाधवसाहेब व खर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री केशव (तात्या) गायकवाड साहेब,तसेच श्री.निकम साहेब,बडेसाहेब,मोहिते साहेब यांनी आलोक व त्याचे मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांचे अभिनंदन केले.


Post a Comment

Previous Post Next Post